मालवण / प्रतिनिधी-
मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी आणि दुर्गा स्टोअरचे मालक चंद्रशेखर उर्फ शेखर भगवान तारी (६५) यांचे आज अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. माजी नगरसेवक श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी व छोटू तारी यांचे ते बंधू होत. बाजारपेठ येथील रामेश्वर मांड देवस्थानच्या जिर्णोद्धार आणि धार्मिक कार्यक्रमात तारी यांचा नेहमीच पुढाकार होता. ते परोपकारी व दानशूर वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रामेश्वर मांड देवस्थानतर्फे त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.









