भूषण माडये याची तत्परता : वन्यजीव बचाव कार्यात नेचर क्लबचा पुढाकार
प्रतिनिधी / मालवण:
तालुक्यातील तारकर्ली एमटीडीसी शेजारील समुद्र किनारी कुवर हा सागरी पक्षी उडण्यास असमर्थ असल्याचे भूषण शरद माडये यांच्या निदर्शनास आले. त्याने इतरांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी आपल्या ताब्यात घेऊन घरी नेले. मालवण नेचर क्लबच्या प्रा. हसन खान यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे माडये कुटुंबाने त्याची काळजी घेतली.
ही बाब मालवण फॉरेस्ट कर्मचारी रामकृष्ण मडवळ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानुसार मडवळ यांनी भूषणच्या घरी जाऊन पक्ष्याला ताब्यात घेतले व पशु वैद्यकीय डॉक्टरांना दाखवून प्राथमिक उपचार केले. काल कुवरला (Gull) मडवळ व त्यांचे सहकाऱयांनी किनाऱयाला सोडले आणि पाहुणा उडून गेला. या पक्ष्याचे इंग्रजी नाव Slender_Billed_Gull असून शास्त्राrय नाव Chroicocephalus (Larus) Genei असे आहे. मराठीत सांगायचे झाले, तर पातळ चोचीचा कुवर असे त्याला संबोधले जाते. IUCN नुसार याची संख्यात्मक दृष्टीने स्थिती Least Concern आहे. हा स्थलांतरित पक्षी असून हिवाळ्य़ात आपल्याकडे येतात, अशी माहिती खान यांनी दिली. भूषण व माडये कुटुंबाने केलेल्या कार्याचे विविधस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.









