प्रतिनिधी / मालवण:
मालवणात मनसेचे मदत कार्य सुरूच आहे. तौक्ते चक्रीवादळ व कोरोनाची दुसरी लाट यामुळे मालवणात अनेक कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत. तालुका व शहरातील नागरिकांसाठी मनसेही सरसावली आहे.
मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांनी पेंडुर, पोईप, विरण, कोळंब, सर्जेकोट, वडाचापाट, मालोंड, मसदे, मसुरे, वेरली या गावातील तसेच शहरातील 100 कुटुंबांना धान्य वाटप केले. यावेळी प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ, 4 किलो गहू, 1 किलो साखर, 1 तेल पिशवी, पाव किलो चहा-पावडर, 1 मीठ पिशवी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे धान्य वाटप शहर अध्यक्षा भारती वाघ यांच्या हस्ते झाले. वादळामुळे छप्पर उडालेल्या घरांनाही मनसेने पत्रे व कौलांचे वाटप केले. तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, नितीन खानोलकर, महिला शहर अध्यक्षा भारती वाघ, गोपाळ शेलटकर आदी उपस्थित होते.









