प्रतिनिधी/ बेळगाव
एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टी भरणा करणाऱयांना महापालिकेच्यावतीने 5 टक्के सूट देण्यात येते. एप्रिलअखेरपर्यंत ही सवलत देण्यात येते. मात्र यंदा कोरोना प्रसारामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे 5 टक्के सवलत देण्याकरिता दि. 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदत केवळ 10 दिवस शिल्लक राहिली आहे. काही मालमत्ताधारकांनी ऑनलाईन घरपट्टी जमा केली असल्याने आतापर्यंत 3 कोटी रुपये मनपाच्या खजिन्यात जमा झाले आहेत.
घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह नागरिकांना कर सवलतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने महापालिकेने ऑनलाईन घरपट्टी भरण्याची सुविधा सुरू केली आहे. पण यंदा कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने कर वसुलीची मोहीम ठप्प झाली होती. तसेच लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेरही पडता आले नाही. त्यामुळे आगाऊ घरपट्टी भरणाऱया नागरिकांना 5 टक्के सवलत देण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. पण लॉकडाऊन काळात केवळ ऑनलाईनद्वारा कर भरण्याची सुविधा सुरू होती. त्यामुळे ऑनलाईनद्वारा आतापर्यंत मालमत्ताधारकांनी तीन कोटीची घरपट्टी जमा केली आहे.
लॉकडाऊन कालावधीत मनपा कार्यालयात कर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच बेळगाव-वन देखील बंद ठेवल्याने घरपट्टी भरता आली नाही. त्यामुळे 5 टक्के सवलतीच्या मुदतीत आणखीन वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना दि. 31 मे पर्यंत 5 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे केवळ दहा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
महापालिका व्यापारी संकुल-गोवावेस, महापालिका कार्यालय, रिसालदार गल्ली, अशोकनगर आणि टी.व्ही सेंटर अशा विविध ठिकाणी बेळगाव-वनच्या कार्यालयात कर भरणा करून घेण्यात येत आहे. मागील वषीचा कर भरला नसल्यास अशा मालमत्ताधारकांना चलन घेणे बंधनकारक आहे. पण मनपाचे कर्मचारी कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने चलन मिळणे अशक्मय आहे.
घरपट्टी भरण्याबाबत संभ्रम
2020-21 या आर्थिक वर्षात घरपट्टी वाढ करण्यात आली आहे. पण त्यापेक्षा जास्त वाढ करून चलन देण्यात येत आहे. तसेच घरपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा 45 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. एप्रिल महिन्यात 5 टक्के सवलत मिळत असल्याने शेकडो मालमत्ताधारक घरपट्टी भरतात. त्यामुळे एप्रिल महिन्यात 10 कोटीहून अधिक घरपट्टी जमा होते. पण यंदा कोरोनामुळे आतापर्यंत केवळ तीन कोटी रक्कम मनपाच्या खजिन्यात जमा झाली आहे.









