प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुका पोलिसांनी मालगाव येथे दोन ठिकाणी दारू अड्डयांवर छापे टाकून दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालगाव येथे बस डेपोच्या आडोशाला दारू विक्री करणारा विक्रम राजेंद्र आवळे (वय 32, रा. मालगाव, ता. सातारा) याच्यावर कारवाई करुन 840 रुपयांच्या 14 देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच फरिदा एनाज पटेल (वय 35, रा. इंदिरानगर, मालगाव) हिच्यावर कारवाई करुन तिच्याकडून 660 रुपयांच्या 11 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









