मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी स्थानिक नागरिकांशी गैरवर्तन केले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भास्कर जाधव यांनी महिलेवर केलेली अरेरावी मालकाला खूश करण्यासाठी होती अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. जाधवांनी विधानसभेत गैरवर्तन केलं आणि आता रविवारी जाहीर कार्यक्रमातही त्यांनी गैरवर्तन केलं अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने या आपत्तींवर दीर्घकालीन तोडगा आणि तात्काळ मदत करायला पाहिजे. परंतू राज्य सरकार मदत करण्यामध्ये कुचराई करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने दिलदारी दाखवली पाहिजे तशीच बॉलिवूडनेही दाखवली पाहिजे याला आम्ही सहमत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








