प्रतिनिधी /वास्को
कासावलीच्या माजी सरपंच तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्था साल्ढाना यांनी तसेच काँग्रेसचे कुठ्ठाळी मतदारसंघाचे मागच्या निवडणुकीतील उमेदवार व सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मारीयानो रॉड्रिक्स यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नसले तरी गोवा फॉरवडची काँग्रेसची होणारी संभाव्य युती पसंद न पडल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सहा वेळा पंच सदस्य बनलेल्या आणि जवळपास वीस वर्षे कासावलीचे सरपंचपद भुषवीलेल्या मार्था साल्ढाना तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य मारीयानो रॉड्रिक्स यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्षापासून फारकत घेतल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. मार्था साल्ढाना व मारीयानो रॉड्रिक्स इतर राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात.









