वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोविड19 च्या महामारीमुळे चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) या कालावधीत आंतरराष्ट्रीय व्यापारात तीन टक्क्मयांची घसरण झाली आहे. याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्राच्या व्यापारी संघटनेच्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड ऍण्ड डेव्हलपमेन्टच्या नवीन अहवालात सादर करण्यात आली आहे. तसेच आगामी एप्रिल ते जून या तिमाहीतही आंतरराष्ट्रीय व्यापार मार्च तिमाहीच्या तुलनेत 27 टक्क्मयांनी घट होण्याची चिंताही यावेळी व्यक्त केली आहे.
अहवालाच्या माहिती नुसार अंकटाडच्या फ्री मार्केट कमोडिटी प्राईस निर्देशांकाचे मूल्य जानेवारीत 1.2 टक्के, फेब्रुवारीत 8.5 टक्के आणि मार्चमध्ये 20.4 टक्क्मयांनी घसरण झाली आहे. या आकडेवारीवरुन विकसनशील अर्थव्यवस्थेकडून निर्यात करण्यात येणाऱया किमतीमध्ये बदल होत असल्याचे संकेत निर्माण होत असलयाचे स्पष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
प्रमुख उत्पादनांची भूमिका
सदरची घसरण होण्यामागे काही प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे. यात मुख्य वाटा हा इंधनांच्या किमतीचा असून यांची मार्च महिन्यात 33.2 टक्क्मयांनी घसरण झाली आहे. तर खनिजे, धातू , खाद्यपदार्थ आणि शेती संबंधीत कच्च्या मालांमध्ये 4 टक्क्मयांची घसरण नेंदवण्यात आली आहे.









