वृत्तसंस्था/ मुंबई
बँकांचा सकल एनपीए मार्च 2021 पर्यंत वधारुन 10.1 ते 10.6 वर पोहोचण्याचे संकेत रेटिंग एजन्सी इक्रा कडून देण्यात आला आहे. तर बँकांचा निव्वळ एनपीए 3.1 ते 3.2 टक्क्यांवर पोहचणार असल्याचा अंदाजही इक्राकडून नोंदवला आहे.
रेटिंग एजन्सीच्या अंदाजानुसार मार्च 2022 पर्यंत निव्वळ एनपीए घटून 2.4 ते 2.6 टक्क्यांवर राहणार असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. तथापि, नव्या अनुमानानुसार कोरोना काळात कर्ज फेडीवर परिणाम झाल्याने थकबाकी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जाच्या रक्कमेवर होणारी कपात आता समाप्त करण्यात आली आहे. संपत्ती वर्गीकरणावर उच्चतम न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. भविष्यात बँकाचा सकल एनपीए आणि शुद्ध एनपीए वधारुन क्रमशः 10.1 ते 10.6 टक्क्यांवर आणि 3.1 ते 3.2 टक्क्यांवर पोहोण्याचे संकेत आहेत. हा आकडा सप्टेंबर 2020 पर्यंत क्रमशः 7.9 टक्के आणि 2.2 टक्के इतका राहिला होता. पुढील काही काळात अर्थव्यवस्था सुधारल्यास थकबाकी कमीही होऊ शकते.
अहवालातील उपलब्ध आकडेवारीनुसार 2021-22 मध्ये निव्वळ एनपीए आणि कर्जासाठीचे प्रावधान खालच्या पातळीवर राहिणार असल्याचा अंदाज आहे, कारण बँकांचा कर्ज पोर्टफोलियो मजबूत संकलनावर राहिलेला आहे.









