प्रतिनिधी / चिपळूण
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हानेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुकवारी धाड टाकून दोन दुचाकीसह 53 हजार 314 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राजेंद्र कृष्णा चव्हाण, सुबोध रामचंद्र सकपाळ, रवींद्र रामचंद्र आंब्रे, कुमार सुनातन रॉय, अनिल भिवा साबळे, योगेश पर्शुराम शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास हे पाचजण मार्गताम्हाने येथे बेकायदा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









