फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे दिवस सध्या काही ठिक नाहीत. 5 ऑक्टोबरला तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक आणि व्हॉट्सअप अनेक तास बंद राहिल्यामुळे त्यांच्या प्रति÷sवर परिणाम झाला. त्यातच त्यांच्याच एक सहकारी फ्रान्सेस होगन यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. फेसबुकची काही उत्पादने लहान मुलांवर विपरित परिणाम करीत असून त्यामुळे त्यांची हानी होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकाने झुकरबर्ग यांच्यावर टीकेची झोड उठविली. झुकरबर्ग यांचे छायाचित्र छापून त्याखाली ‘डिलिट फेसबुक’ अशी फोटोओळ छापण्यात आली.
फ्रान्सेस होगन यांनी झुकरबर्ग यांच्यामागे हात धुवून लागण्याचे ठरविलेले आहे. फेसबुक कंपनीच्या संदर्भात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. अमेरिकन काँग्रेससमोर वक्तव्य करताना त्यांनी फेसबुकवर देशाशी बेईमानी करत असल्याचाही आरोप केला. चीन आणि इराण आपल्या प्रतिस्पर्धी आणि शत्रू देशांचे गुपिते शोधण्यासाठी फेसबुकचा उपयोग करत आहेत, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. त्यामुळे झुकरबर्ग यांच्यावर बचावात्मक पवित्रा घेण्याची वेळ आली आहे.
फेसबुकच्या सिव्हिल इंटिग्रीटी (सामाजिक एकनि÷ा) संदर्भात टाईमच्या मुख्य लेखात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हानीकारक माहिती आणि द्वेष पसरविणारा आशय प्रसारित करणाऱयांविरोधात फेसबुकने घेतलेली भूमिका अत्यंत नकारात्मक आहे, असे या नियतकालिकाचे म्हणणे आहे. इन्स्टाग्राम या लोकप्रिय माध्यमाचे काही कार्यक्रम युवावर्गाच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करतात, असा निष्कर्ष कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणात काढण्यात आला होता. हा अहवाल झुकरबर्ग यांनी दडवल्याचा आरोपही करण्यात येत आहे.









