वार्ताहर/ किणये
बेळगाव ग्रामीण महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची शनिवारी सकाळी मार्केट यार्ड परिसरात प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला मार्केट यार्ड बंधू व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. म. ए. समितीच्या आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी अडत व्यापाऱ्यांनी केला आहे.
शनिवारी सकाळी मार्केट यार्डातील प्रत्येक अडत व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन आर. एम. चौगुले यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर या परिसरात भव्य प्रचारफेरी काढली. आपल्या संपर्कात असलेल्या शेतकऱ्यांची आम्ही भेट घेऊन म. ए. समितीच्या चौगुले यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगणार आहे, असे आश्वासनही अडत व्यापाऱ्यांनी दिले आहे.
मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी विधानसभेत म. ए. समितीचा उमेदवार पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी चौगुले यांना निवडूण आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बाळाराम पाटील, एन. बी. खांडेकर, अशोक बामणे, मोहन बेळगुंदकर, माणिक होनगेकर, आर. आय. पाटील. एल. एस. होनगेकर, बसवंत मायाण्णाचे, संयज चौगुले, संभाजी होनगेकर, राजू पाटील, किरण केदार, राजू काकती, सिद्धार्थ नरेगावी, अभिजीत मोरबाळे, प्रशांत पाटील, प्रवीण चांदिलकर, प्रशांत झंगरुचे, किरण जाधव आदींसह व्यापारी उपस्थित होते.