वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील मार्कंडेय नदीचे पात्र नुकत्याच झालेल्या पावसाने पुरात फुटून मोठे नुकसान झाले होते. या संदर्भात दै. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून सदर बाब संबंधित अधिकारी वर्गात निदर्शनाला आणून दिली. याची दखल घेत अधिकारी वर्गाने प्रत्यक्षात पाहणी केले. सुळगा (हिं.) या गावाच्या शेतावरूनच भात, ऊस, भाजीपाला अशा शेतवडीतून मार्कंडेय नदीचे पात्र आहे. शेतवडीमध्ये या नदीपात्राच्या एका वळणावर नदीला आलेल्या पुरामुळे पात्र फुटून हजारो एकर जमिनीतील भात पिकाचे मोठे नुकसान झाले.
गावातील संबंधित शेतकरी वर्गाने झालेल्या नुकसानीबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करून पात्राची दुरुस्ती करावी व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने ग्रामस्थ, पंचकमिटी व ग्राम विकास मंडळाकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याचीच दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष युवराज कदम तसेच मृणाल हेब्बाळकर, तां. पं. सदस्य नारायण कदम, पंच कमिटी अध्यक्ष परशराम पाटील, यल्लाप्पा कदम, बाळू देवगेकर, टोप्पाणा पाटील, परशराम पाटील, मारुती चौगुले विलास देवगेकर, महादेव कंग्राळकर, अशोक य. पाटील, भागाण्णा नरोटी, यल्लाप्पा कलखांबकर, यल्लाप्पा चौगुले, यल्लाप्पा पाटील, टोप्पाणा पाटील, यल्लाप्पा गडकर, परशराम तुप्पट, यल्लाप्पा चौगुले, नारायण कलखांबकर, लक्ष्मण कदम व शेतकरी उपस्थित होते.
सदर नदीपात्र फुटलेला भाग तसेच झालेल्या भात पिकाचे व जमिनीचे नुकसान याबाबत ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचेशी संपर्क साधून सदर माहिती देण्यात आली. यावेळी आमदार व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यावतीने नदीपात्राची दुरुस्ती तसेच शेतकरी वर्गाचे झालेले नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचे आश्वासन यावेळी शेतकरी वर्गाला देण्यात आले.









