नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मारूती सुझुकीने मे महिन्यात 18 हजार 539 मोटारी विकल्या असल्याचे समजते. मागच्या वर्षीच्या मेमधील विक्रीच्या तुलनेत ही घट 86 टक्के इतकी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीच्या कारखान्यातील उत्पादन मेमध्ये सुरू झाले आहे. कंपनीने सरकारच्या सूचनेनुसार सर्व ते नियम पाळून कामकाज सुरू केले आहे. मनेसार (12 मे) व गुरूग्राम (18 मे) येथे निर्मिती कारखाने सुरू झाले. गुजरातमध्येही कंपनीने उत्पादनाला सुरूवात केलीय.









