वृत्तसंस्था/ गुरगाव
मारुती सुझुकीच्या उत्पादनामध्ये जानेवारी 2022 मध्ये अल्पशी वाढ झाली असल्याची माहिती आहे. मारुती सुझुकी कंपनीने या संदर्भातली माहिती शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, जानेवारी 2022 मध्ये 1 लाख 61 हजार 383 वाहनांचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागच्या वषी याच महिन्यामध्ये 1 लाख 60 हजार 975 वाहनांचे उत्पादन घेण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कमतरतेमुळे उत्पादनावर मागच्या महिन्यात परिणाम झाला असल्याची माहितीही मारुती सुझुकीने दिली आहे. कंपनीकडून व्यावसायिक वाहन सुपर कॅरी याचे उत्पादन मागच्या महिन्यामध्ये 3715 इतकेच घेण्यात आले होते.









