गुंतवणूकदारांना 45 रुपयांचा लाभांश देणार
मुंबई
कार निर्मितीमधील देशातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया मारुती सुझुकी कंपनीला चौथ्या तिमाहीत 1,166 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एक वर्षापूर्वी समान कालावधीच्या तुलनेत कंपनीला 9.7 टक्क्यांनी हा लाभ कमी झाल्याची नोंद केली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रती समभाग 45 रुपयांचा लाभांश दिला असल्याचीही माहिती आहे.
कंपनीने नुकताच आपला तिमाहीमधील नफा कमाईचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. अधिकच्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2021 मध्ये एकूण विक्री 22,958 कोटी रुपयांवर राहिली आहे. 2020 मध्ये याच कालावधीच्या तुलनेत हा आकडा 33.6 टक्क्यांनी अधिक आहे.
तिमाहीत 4.92 लाख गाडय़ांची विक्री
जानेवारी ते मार्च 2021 च्या तिमाहीमध्ये एकूण 4 लाख 92 हजार 235 गाडय़ांची विक्री केली होती. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीच्या तुलनेत विक्री 27.8 टक्क्यांनी अधिक आहे. याचदरम्यान 35,528 वाहनांची निर्यातही कंपनीने केली असल्याची नोंद आहे.









