मुंबई
चारचाकी वाहन विक्रीत आघाडीवर असणाऱया मारूती सुझुकीच्या नफ्यात तिसऱया तिमाहीअखेर 24 टक्के इतकी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नफ्यावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1 हजार 941.1 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 1 हजार 564 कोटी रुपये इतका होता. यापूर्वीचा अंदाज हा 1 हजार 860 कोटींच्या नफ्याचा वर्तवला गेला होता. तिमाहीचा निकाल बाहेर पडल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागात 3 टक्क्यापर्यंत गुरूवारी घसरण दिसली होती. एकूण महसूल 23 हजार 457 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत हा महसूल 13 टक्के वाढीव आहे.









