तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
मारुती गल्ली, अनगोळ येथील मारुती मंदिरासमोर असलेली कूपनलिका गेल्या 15 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. तेव्हा तातडीने या कूपनलिकेची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
24 तास पाणीपुरवठा असला तरी या परिसरात शेतकरी मोठय़ा संख्येने राहतात. त्यामुळे त्यांना जनावरांना लागणाऱया पाण्यासाठी ही कूपनलिका महत्त्वाची आहे.
विहिरी असल्या तरी त्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने कूपनलिकेची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









