वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी मारुती सुझुकी कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझाला भारतीय बाजारात सादर केलेले आहे. ऑटो एक्स्पो 2020 मध्ये कंपनी या कारवरील पडदा उघडला होता. नवीन विटारा ब्रेझाला आता तीन डय़ूल टोन पेंट स्कीमसोबत दाखल केले आहे. यामध्ये सिजलिंग रेड, डार्क ब्लू आणि ग्रेनाइट ग्रे कलर निवडण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.34 लाख रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तरी मॉडेलनुसार किमतीत बदल असल्याचेही स्पष्ट केले आहे.
नव्या लूकमध्ये विटाराचे आगमन
विटारा ब्रेझामध्ये फेसलिफ्ट मॉडेलला नवीन प्रंट ग्रिल आणि इंटीग्रेटेड एलईडी डीआरएल व हेडलॅम्प दिला आहे. ब्रेझा फेसलिफ्टमध्ये आता बीएस-6 कम्प्लायंटचे 1.5 लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिन आहे. जे 103बीएचपी पॉवर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करते आहे.