प्रतिनिधी/ बेळगाव
गवत गंजीला लागलेली आग विझविताना झालेल्या वादावादीतून नवी गल्ली, शहापूर येथील एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती. शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी सोमवारी शहापूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
सोहेल अस्लम नाईकवाडी (वय 20), रब्बानी इलियाज नाईकवाडी (वय 19, दोघेही रा. भारतनगर, शहापूर), शाहीद इस्माईल बेटगेरी (वय 23, रा. नवी गल्ली, शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
शुक्रवारी रात्री नवी गल्ली परिसरात गवतगंजीला आग लागली होती. यावेळी आग विझविताना झालेल्या वादावादीनंतर अरिहंत जक्कण्णावर (वय 29, रा. नवी गल्ली) याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी 323, 326, 341, 504, 506 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता.









