मायावती दिल्लीत दाखल – दिल्लीत आज होणार अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बसप अध्यक्षा मायावती यांच्या मातोश्री रामरती याचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या. दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आईच्या निधनाची माहिती कळताच मायावती यांनी अत्यंदर्शनासाठी दिल्लीत धाव घेतली आहे. 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीतच मायावती यांच्या मातोश्रींवर अंत्यसंस्कार होणार आहेत. बसपचे महासचिव सतीशचंद्र मिश्र यांनी यासंबंधी शोकसंदेश जारी केला आहे. एक वर्षापूर्वी मायावती यांचे वडिल प्रभूदयाल यांचे निधन झाले होते.









