उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसप स्वतंत्रपणे लढणार :मायावतींची घोषणा
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे होणाऱया विधानसभा निवडणुकीत बसप युती करणार नसून, विधानसभा स्वबळाबर लढवणार असल्याचे बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, याआधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोठय़ा पक्षासोबत युती न करता लहान पक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. आता मायावतींनीही स्वबळाचा नारा दिल्याने आगामी निवडणुकीतील रंगत वाढू शकते. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार स्थापन झाले तर, राज्यातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन मायावती यांनी दिले आहे. देशात शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार असून मायावती यांनीही कोरोना लसीकरणाचे स्वागत करत देशात कोरोना लस मोफत देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारला केली









