रायबाग तहसीलदार डॉ. आर. एच. बागवान
वार्ताहर/ रायबाग
कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रशासनाने याची दखल घेत शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे. याचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. तालुक्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती रायबाग तहसीलदार डॉ. आर. एच. बागवान यांनी दिली. ते रायबाग येथील ता. पं. सभाभवनात अधिकाऱयांना मार्गदर्शन करताना बैठकीत बोलत होते.
राज्य सरकारने शुक्रवार रात्री 10 पासून सोमवारी सकाळी पहाटेपर्यंत विकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे. याची दखल घेत नागरिकांना आवाहन करताना तालुक्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, ग्रा. पं. क्षेत्रात तेथील अधिकाऱयांनी नागरिकांनी जागृती करावी, कर्फ्यूबद्दल माहिती द्यावी, नागरिकांनी फक्त अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, किराणा दुकाने सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत सुरु ठेवावेत, दुध, औषधे व भाजीपाला विक्रीसाठी नियमावली राबवावी, अशा सूचनाही तहसीलदार बागवान यांनी अधिकाऱयांना दिली.
याप्रसंगी सीपीआय एच. डी. मुल्ला, ता. पं. ईओ डॉ. सुरेश कद्दु, डॉ. एस. एस. बाणे, पीएसआय राघवेंद्र खोत, शंकरगौडा पाटील यांच्यासह पीडीओ, तलाठी व इतर अधिकारी उपस्थित होते.









