प्रतिनिधी / कुरुंदवाड
गणेशवाडी (ता शिरोळ) सह परिसरातील महिलांच्या हाताला काम नाही महापुरात मोठे नुकसान झाले आहे असे असताना मायक्रो फायनान्स कंपनीचे अधिकारी घरात येवून हप्ते भरा असे दमदाटी करत आहेत या विरोधात सत्यशोधक समाज पक्षाचे संस्थापक दिगंबर सकट यांच्या नेतृत्वाखाली आज महिलांनी मोर्चाने येऊन ग्रामपंचयात कार्यालयासमोर मायक्रोफायनान्सच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
येथे मायक्रोफायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज तसेच हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. यामुळे ग्रामपंचयात कार्यलयासमोर दिगंबर सकट, मुस्लिम सेनेचे समीर पटेल,आशा मडीवाळ जयश्री हुल्लोळे,अक्षय बिरनाळे याच्यासह महिला एकत्रित येवून मायक्रो फायनान्स कंपनीसह अधिकरयनचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना सकट म्हणाले की 2019 मध्ये प्रलयंकारी महापुराने मोठे नुकसान झाले आहे गोरगरीब कष्टकरी महिलाच्या हाताला काम नाही 30 आगस्ट पर्यंत कोणतीही संस्था फायनान्स कम्पनी कर्ज हप्ते वसुली करू नये असा आरबीआय तसेच, न्यायालयाचा आदेश आहेत तरीही देखील मायक्रोफायनान्सचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी रात्री अपरात्री त्रास देत आहेत शासनाकडे आमची मागणी आहे महिलांच्या कर्ज माफ व्हावेत पण शासन व जिल्ह्यातील मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले आहे या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा दिला.
दरम्यान मुस्लिम सेनेचे समीर पटेल म्हणाले की महिलानी आपल्या संसारासाठी कर्ज घेतलेले आहे यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केली आहे पण यावर्षी आपत्ती व कोरोना महामारीत त्यांच्यासमोर मोठी अडचण बनली आहे विजय माल्या सारखे लोक चुना लावून परदेशात पलायन करीत आहेत दुसरीकडे गोरगरीब महिला हातावरच्या पोट असणाऱ्यांची कर्जे का माफ होत नाहीत असा सवाल उपस्थित केला यानंतर जयश्री हुल्लोळे ,आफ्रिन तहसीलदार,रेखा गवंडी, कल्पना कोळी, अश्विनि मोगले आदींनी मनोगतात फायनान्स कंपन्यांचा जाचक वसुलीचा पाडा वाचत संताप व्यक्त केला.
दरम्यान मागण्याचे निवेदन तलाठी एस. भानुसे यांना दिले यावर भानुसे यांनी मागण्या वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Next Article कडेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव








