नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी मायक्रोसोफ्ट इंडिया देशात सर्वात मोठे केंद्र नोएडा येथे स्थापन करणार असून आगामी काळामध्ये 3 हजार 500 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सदरच्या केंद्राच्या उभारणीकरीता कंपनीने नोएडा प्राधिकरणाकडून 60000 चौरस मीटर जमिनीचे संपादन केले आहे. याआधी कंपनीचे सर्वात मोठे केंद्र हैदराबाद जवळील गाची बावली येथे होते. येणाऱया 5 वर्षांमध्ये सदरच्या केंद्राचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर नोएडा व जवळपासच्या 3 हजार 500 हून अधिक जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदरचे केंद्र सुरु झाल्यानंतर एनसीआर भागामध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्मयता सांगता येत नाही. इतर कंपन्यांनाही या ठिकाणी आपले व्यवसाय सुरू करता येणार आहेत.









