चिनी ऍप्सना बंदी घातल्याने सदर व्यवहाराची उत्सुकता वाढली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील टेक जायंट मायक्रोसॉफ्ट कंपनीची नजर आता चायनीज ऍप टिकटॉकवरच नसून देशातील शेअर चॅटवरही राहणार असल्याची माहिती न्यूजपेपर मिंटच्या अहवालामधून दिली आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन शेअर चॅटमध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्मयता असल्याचे बोलले जात आहे. येणाऱया काळात शेअर चॅट आपला विस्तार करण्यासाठी नवीन योजना आखण्याचे संकेत आहेत. या व्यवहारात कंपनीला एक तृतीयांश गुंतवणूक मिळण्याचा अंदाज आहे.
शेअर चॅट आपल्या वर्तमानातील गुंतवणूकदारांकडून निधी जमा करण्याच्या कामाला लागला आहे. तसेच नवीन गुंतवणूकदारांसोबत जुन्या गुंतवणूकरांच्या सोबतही चर्चा सुरु असल्याची माहिती उपलब्ध अहवालातून दिली आहे. या अगोदर ट्विटरने शेअर चॅटमध्ये 750 कोटी गुंतवले आहेत.
टिकटॉक आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील होणाऱया व्यवहाराबाबत जगभरातून उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतामध्ये विरोध झाल्यानंतर अमेरिकेतही बंदी घालण्याची तयारी सुरु आहे. तर दुसऱया बाजूला मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा जागतिक व्यवसायच खरेदी करण्याची तयारी करत आहे. यात प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, न्यूझिलँड आणि ऑस्ट्रेलियामधील व्यवसाय खरेदी करण्याच्या दिशेने चर्चा सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे टिकटॉक आणि मायक्रोसॉफ्टच्या व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.









