सिडनी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार मायकल क्लार्कची सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या ऑफिसर ईन द ऑर्डर या पदावर नियुक्ती केली गेली. यापूर्वी माजी कर्णधार ऍलन बोर्डर व स्टीव्ह वॉ यांना या राष्ट्रीय सन्मानाने भूषवले गेले आहे. ऑस्ट्रेलियाला 2015 चा विश्वचषक जिंकून देणारा क्लार्ककडे ऑस्ट्रेलियाच्या जनरल डीव्हिजनची जबाबदारी असेल. हा सन्मान लाभणाऱया अन्य ऑस्ट्रेलियन कर्णधारांमध्ये बोर्डर-स्टीव्ह वॉ यांच्यापूर्वी मार्क टेलर व बॉब सिम्पसन यांचाही समावेश आहे.
39 वर्षीय मायकल क्लार्क 2015 विश्वचषक विजयानंतर निवृत्त झाला असून त्यापूर्वी त्याने 115 कसोटी, 245 वनडे व 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यावर कसोटीत 8643, वनडेत 7981 व टी-20 मध्ये 488 धावा नोंद आहेत.









