प्रतिनिधी /वाळपई
आपल्या गावात जाणाऱया रस्त्याची दुरुस्ती करुन तो रस्ता डांबरीकरण करावा या मागणीसाठी मान ( ता . खानापूर ) ग्रामस्थानी जांबोटी येथे बेळगाव – गोवा राज्य मार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही गेली 75 वर्षे मान गावच्या लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले प्रशासन आंदोलनाचे हत्यार उगारताच जागे झाले. तहशीलदारानी स्वतः मान गावात जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर तहशीलदार व ईतर अधिकारी मान गावात गेले.या आंदोलनात लहान मुले , महिला आणि वृद्धा?नी घेतलेल्या सहभागामुळे बोथट झालेल्या प्रशासनाच्या संवेदना जागृत झाल्या . तहसीलदार , पोलीस , वन खाते आणि जि . पं . अभियंत्यांनी आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मान गावाच्या रस्त्याची पाहणी करून संबंधित खात्यांच्या समन्वयाने रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही मान ग्रामस्था?ना दिली .
मानच्या 4 कि . मी . अंतराच्या संपर्क रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर असतानाही वन खाते रस्त्याचे काम करू देत नसल्याने ग्रामस्था?ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे . चिखलात अडकलेली वाहने काढण्यासाठी दोरखंड लावून कसरत करावी लागत आहे . रोजच्या या समस्येला कंटाळून ग्रामस्था?नी गुरुवारी जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन छेडून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला . दुपारी 12 वाजता रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखण्यात आली . तहसीलदार प्रवीण जैन आणि पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी आंदोलन करणाऱया ग्रामस्था?नी समजून काढली.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना रस्त्यासारखी मूलभूत गरज पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर सर्वसामान्यांनी लोकशाहीवर कसा विश्वास ठेवावा • असा प्रश्न मानवासियांनी उपस्थित केला . तसेच रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला .









