ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा म्हणजेच 3 जूनला मान्सून दक्षिण केरळात दाखल झाला. महाराष्ट्र, तेलंगणा, तसेच आंध्रप्रदेशमधील काही भागांमध्ये 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या आज दुसऱ्याच दिवशी मान्सूनने केरळसह, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचाही काही भागात एन्ट्री केली आहे.
मान्सूनला पोषक हवामान असल्याने मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र आणि गोव्यातही दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.