ऑनलाईन टीम / मुंबई :
नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा म्हणजेच 3 जूनला मान्सून दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनने केरळसह, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात एन्ट्री केली होती. मान्सूनला पोषक हवामान असल्याने 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून आज रत्नागिरीच्या हर्णे येथे दाखल झाला. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात सोलापूर तर मराठवाड्यातील काही भागात पोहचला असून, लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
जुलै मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल. दरम्यान, देशात मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.