पुणे / प्रतिनिधी
गेले चार महिने देशात मुक्कामी असलेला नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 1 जूनला केरळात दाखल झालेला मान्सून यंदा देशभरात दमदार बरसला आहे. अनेक राज्यात सर्वसाधारण पाऊस झाला आहे. दरम्यान, बिहार व लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. यामुळे बिहार तसेच लगतच्या पूर्वोत्तर भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.








