वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व स्क्वॅशपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताची महिला स्क्वॅशपटू ज्योश्ना चिन्नाप्पाने महिलांच्या विभागात दहावे स्थान मिळविले आहे. 35 वर्षीय चिन्नाप्पाने 2016 नंतर महिला स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या दहा खेळाडूमध्ये पुनरागमन केले आहे.
विश्व पुरूष स्क्वॅशपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सौरभ घोशाल 16 व्या स्थानावर आहे. त्याचे मानांकनातील स्थान एका अंकाने घसरले आहे. आगामी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीय स्क्वॅशपटूंच्या कामगिरीकडे अधिक लक्ष राहील. 2014 च्या ग्लॅस्गो राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका पल्लीकल आणि चिन्नाप्पा यांनी महिला दुहेरीत सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास घडविला होता.