ऑनलाईन टीम / पुणे :
अभिनेत्री मानसी नाईकशी छेडछाड झाल्याचे घटना समोर आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आली असताना हा प्रकार घडला. मानसी पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना छेडछाड झाल्याची घटना घडली.
दरम्यान, मानसीने मुंबईतील साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. साकिनाका पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी रांजणगाव पोलिसांकडे सोपवली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
मानसी म्हणाली, मी एक कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने माझ्या सोबत गैरकृत्य केले. तसेच त्या व्यक्तीने मला मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला.