प्रतिनिधी / कोल्हापूर
मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक परिसरात गोळीबार केलेल्या मानसिंग बोंद्रेच्या मागावर पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये एलसीबीची तीन आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दोन पथकांचा समावेश आहे. जिल्हÎासह जिल्हाबाहेर ही बोंद्रेचा शोध सुरु असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.
शिक्षण संस्था, मालमत्ता वादातून मानसिंग विजय बोंद्रे रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी याने चुलत भावावर सोमवारी मध्यरात्री गोळीबार केला. रिव्हॉल्वरमधून 5 राउंड फायर करुन परिसरात दहशत माजविली. अंबाई टँक नजीक हि घटना घडली. या प्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम, खूनाचा प्रयत्न या कलमांन्वये जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय 33 रा. अंबाई टँक) यांनी दिली. याप्रकारनंतर मानसिंग बोंद्रे फरार झाल्याने पोलिसांकडून जिल्हÎासह जिल्हयाबाहेर त्याचा शोध सुरु आहे.
पिस्तुल कोणाचे याचाही शोध सुरु
मानसिंग बोंद्रे याच्याकडे असलेले पिस्तुल यापुर्वीच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका प्रकारामध्ये जप्त केले आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री केलेल्या गोळीबारामध्ये बोंद्रे याने वापरलेले पिस्तुल कोणाचे याचाही शोध पोलिस घेत आहेत.









