प्रतिनिधी / पलुस
मानसिंग बँक ही सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांची सेवा लोकांच्या घराघरापर्यंत पोहचली आहेअसे प्रतिपादन,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनि व्यक्त केले. मानसिंग को ऑप बँक शाखा कराड या शाखेचा नववा वर्धापनदिन उत्साहात पार पडला यावेळी वर्धापनदिनानिमित्त कराड शाखेला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे आमदार आनंदराव पाटील, सुरेश हाळवणकर, यांनी भेट दिली यावेळी सहकार मंत्री मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
मानसिंग बँकेने मोबाईल बँकिंग, मोबाईल रिचार्ज तसेच फास्ट टॅग व इतर सेवा या घरबसल्या पुरवलेल्या आहेत त्यामुळे ही बँक सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहचली आहे, याचे सर्व श्रेय या बँकेचे संस्थापक काटेकोरपणे नियोजन असलेले जे के बापू जाधव यांना दिले पाहिजे, तसेच त्यांना साथ देणारे या बँकेचे चेअरमन सुधीर भैया जाधव, व्हा चेअरमन शीतल सावळवाडे आणि संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या प्रयत्नाने बँकेची घौडदौड अत्यंत चांगल्या पध्द्तीने चालली आहे. यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैया जाधव, सातारा जिल्हा उपनिबंधक