ऑनलाईन टीम / ओस्लो :
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने (UNDP) जाहीर केलेल्या अहवालानुसार 2020 च्या मानव विकास निर्देशांकात 189 देशांच्या यादीत नॉर्वे अव्वल आले आहे. त्यानंतर आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँडचा क्रमांक लागतो.
मानव विकास निर्देशांक हे आरोग्य, शिक्षण आणि राष्ट्रातील जीवनमान यानुसार राष्ट्रांचे दर्जा ठरवणारे परिमाण आहे. या यादीत यंदा भारताचे स्थान दोन अंकांनी घसरले आहे. या यादीत भारत 131 व्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी भारत 129 व्या स्थानावर होता. भारता शेजारील देश श्रीलंका 72 व्या, चीन 85 व्या, बांग्लादेश 133, म्यानमार 177, नेपाळ 122, पाकिस्तान 144आणि अफगाणिस्तान 19 व्या क्रमांकावर आहे.









