योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल माहिती सांगितलेली आहे. ही सात मुख्य चपे आपल्या शरीरात असतात असे मानले गेले आहे. चक्र ही एक योगविषयक संकल्पना आहे. ही चपे आपल्या शरीरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते. प्राणिक हीलिंगमध्ये मास्टर चोआ कॉक सुई यांनी मानवी शरीरात 11 प्रमुख चपे असतात असे सांगितले आहे. ही चपे आपली इंद्रिये व अवयवांवर नियंत्रण ठेवून ऊर्जा पुरवतात, पण त्याबरोबरच माणसाची आध्यात्मिक आणि मनोवृत्तीही प्रभावित करतात. मास्टर चोआ यांनी ही चपे कशी दिसतात, त्यांच्यात कोणत्या रंगांची प्राणशक्ती आढळते, कोणते चक्र कोणत्या अवयवाशी निगडित आहे याचा सखोल अभ्यास करून त्याचा अभ्यासक्रम तयार केला आहे.
1.बेसिक चक्र ः हे चक्र आपल्या माकडहाडाजवळ असते. त्याला 4 पाकळय़ा असतात. त्यात लाल, पिवळी आणि नारंगी प्राणशक्ती असते. त्यामुळे पाठीशी निगडित व्याधी, अस्थी व स्नायुशी निगडित आजार बरे करताना या चक्राची जास्तीत जास्त ऊर्जा सफाई केली जाते. बेसिक चक्र बिघडल्यास शरीर अशक्त होते, पाठीचा कणा वाकतो. बेसिक चक्रामधूनच सगळय़ा चक्राना ऊर्जा पुरवली जाते. त्यामुळे या चक्राला रूट चक्र असेही म्हटले जाते.
2. सेक्स चक्र ः हे चक्र दोन्ही जांघांच्या मधील भागात असते. त्याला सहा पाकळय़ा असून त्यात लाल व नारंगी प्राणशक्ती असते. या चक्राला कनि÷ किंवा शारीरिक, प्राकृतिक निर्माणशक्तीचे केंद्र असे म्हणता येईल. या चक्रात बिघाड झाल्यास मूत्रविकार, नपुंसकता, वांझपणा, अपत्यहीनता, प्रोस्ट्रेट ग्रंथीची वाढ असे रोग होण्याची शक्मयता असते.
3.मेंग मिन चक्र ः हे चक्र आपल्या बेंबीच्या मागील बाजूस पाठीच्या कण्याच्या रेषेत असते. त्याच्या 8 पाकळय़ा असतात आणि त्यात नारंगी आणि थोडय़ा प्रमाणात लाल, पिवळी आणि निळी प्राणशक्ती आढळते. इतर चक्रांच्या तुलनेत या चक्राचा आकार 1/2 ते 2/3 असतो. हे चक्र आपल्या रक्तदाबावर प्रभाव पाडते. जेव्हा या चक्राचा आकार मापात असतो तेव्हा आपला रक्तदाबही प्रमाणात असतो.
4.नेव्हल चक्रः हे चक्र आपल्या बेंबीवर असते. याला 8 पाकळय़ा असतात. त्यात पिवळय़ा, हिरव्या, निळय़ा, लाल आणि जांभळय़ा प्राणशक्ती असतात. ऊर्जावहिन्या नाडय़ांमधून प्राणशक्तीचा संचार सुलभपणे होण्यासाठी या चक्राचा वापर होतो. हे चक्र आपले लहान आतडे, मोठे आतडे, प्रसृतीचा वेग, अशक्तता या सर्व बाबींचे नियंत्रण करते.
5.स्प्लिन चक्र ः हे चक्र सर्वात खालच्या डाव्या बरगडीच्या मध्यभागी असते. मागील स्प्लिन चक्र पुढील स्प्लिन चक्राच्या मागच्या बाजूला असते. दोन्हींचे कार्य एकसारखेच आहे. या चक्राला 6 पाकळय़ा असतात. वायू प्राणशक्ती व वायू चैतन्यकोषांचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे. स्प्लिन चक्र इतर प्रमुख चक्रांचे उर्जन करते. स्प्लिन चक्रात बिघाड झाल्यास प्लिहेचे विकार, अशक्तपणा, चैतन्याचा अभाव, रक्तदोष, सांधेदुखी, संधिवात हे रोग संभवतात.
6.सोलर प्लेक्सस चक्र ः हे चक्र बरगडय़ांच्या खाली मध्यभागी पोकळीत असते. मागील सोलर प्लेक्सस चक्र हे पुढील सोलर प्लेक्सस चक्राच्या बरोबर मागच्या बाजूला असते. या चक्राला दहा पाकळय़ा असतात आणि त्यात लाल, पिवळय़ा, हिरव्या आणि निळय़ा प्राणशक्ती असतात. तसेच थोडय़ा प्रमाणात नारंगी व जांभळय़ा प्राणशक्तीही असतात. रक्तशुद्धतेवर या चक्राचा परिणाम होत असतो कारण हे चक्र यकृताला नियंत्रित करते व उर्जित करते आणि यकृत रक्त शुद्ध करते. मागील सोलर प्लेक्सस चक्राने स्वादुपिंड सहज उर्जित केले जाते. महत्त्वाकांक्षा, ध्येय, चिकाटी, नेतृत्व, आक्रमक वृत्ती यासारख्या सकारात्मक किंवा राग, द्वेष, असूया, लोभ, विध्वंसक वृत्ती, जुलूम यासारख्या वाईट नकारात्मक भावनांचे केंद्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. माणसाला जेव्हा खूप राग येतो तेव्हा सोलर प्लेक्सस चक्राची स्पंदने अनियमितपणे कंपायमान होतात. श्वासपटलाची हालचाल वेडीवाकडी होऊन श्वासोच्छ्वास अनियमित होतो.
7. हार्ट चक्र ः हार्ट चक्राला बारा पाकळय़ा असतात. हार्ट चक्रामध्ये खूप प्रमाणात सोनेरी आणि थोडय़ा प्रमाणात लाल प्राणशक्ती असते. पुढील हार्ट चक्र छातीच्या मध्यभागी असते. ते चक्र हृदय आणि थायमस ग्रंथीचे नियंत्रण व उर्जन करते. मागील हार्ट चक्रात सोनेरी, लाल, नारंगी व पिवळी प्राणशक्ती असते. हे चक्र फुफ्फुसे, हृदय, थायमस ग्रंथी यांचे नियंत्रण व उर्जन करते. संसर्गजन्य रोगाशी लढण्याच्या शारीरिक क्षमतेला हार्ट चक्र प्रभावित करते. हार्ट चक्र हे सुसंस्कृत भावनांचे केंद्र आहे. त्याचा सोलर प्लेक्सस चक्राशी घनि÷ संबंध असतो.
8.थ्रोट चक्र ः हे चक्र कंठाच्या मध्यभागी असते. त्याला 16 पाकळय़ा असतात. त्यात मुख्यत्वेकरून निळी प्राणशक्ती असून थोडय़ा प्रमाणात हिरव्या आणि जांभळय़ा प्राणशक्तीसुद्धा असतात. ज्यावेळी आपण काही खातो त्यावेळी मोठय़ा प्रमाणात हिरवी प्राणशक्ती तयार होते. जे चक्र घसा, गळा, स्वरयंत्र, श्वसननलिका, कंठस्थ ग्रंथी या इंद्रियांचे नियंत्रण व उर्जन करते. थ्रोट चक्राच्या सदोष कार्यपद्धतीमुळे वांझपणा आणि गळय़ाखालील लोंबती त्वचा, आवाज बसणे, दमा यासारखे विकार होतात. हे चक्र उच्च निर्मितीचे केंद्र आहे. ज्यांची या चक्राची ऊर्जा मोठी असते ते कलाकार असतात.
9.आज्ञा चक्र ः हे चक्र दोन्ही डोळय़ांच्या व भुवयांच्या मध्यभागी असते. याला 96 पाकळय़ा असतात. त्या 48-48 अशा दोन भागात विभागलेल्या असतात. काही व्यक्तींच्या या चक्राच्या एका भागात मुख्यत्वेकरून फिकट पिवळी आणि दुसऱया भागात मुख्यत्वेकरून फिकट जांभळी प्राणशक्ती असते. इतर व्यक्तीत एका भागात पांढरट हिरवी तर दुसऱया भागात फिकट जांभळी प्राणशक्ती असते. या चक्रात प्रामुख्याने सापडणारी रंगीत प्राणशक्ती भिन्न भिन्न व्यक्तींमध्ये भिन्न भिन्न असू शकते. व्यक्तीच्या मानसिक स्थितीप्रमाणे या प्राणशक्तींचे रंग बदलतात. या चक्राच्या सदोष कार्यपद्धतीमुळे अंतःस्रावी ग्रंथींचे विकार, डोळय़ांचे विकार, कॅन्सर व इतर आजार होऊ शकतात. हे चक्र उच्च व ज्ये÷ किंवा अमृत मानसकेंद्र असून इच्छाशक्ती किंवा मनोप्रेरणेचेही ते स्थान आहे.
10 फोरहेड चक्र ः हे कपाळाच्या मध्यभागी असते. त्याच्या 44 पाकळय़ा असून त्या 12 भागात विभागलेल्या असतात. प्रत्येक भागात 12 पाकळय़ा असतात. या चक्रात जांभळय़ा, निळय़ा, लाल, नारंगी, पिवळय़ा आणि हिरव्या प्राणशक्ती असतात. हे चक्र कानशीलाच्या भागातील पिनियल ग्रंथी आणि मज्जासंस्थांना नियंत्रित करते व उर्जन करते. या चक्रात बिघाड झाल्यास मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात.
11. क्राऊन चक्र ः हे चक्र डोक्मयावर मध्यभागात असते. याला 960 बाह्य आणि आतल्या 12 पाकळय़ा असतात. या पाकळय़ा 2 भागात विभाजित असतात. आतील 12 पाकळय़ात मुख्यत्वेकरून सोनेरी तर बाह्य 960 पाकळय़ात फिक्कट जांभळय़ा, निळय़ा, पिवळय़ा, हिरव्या, नारिंगी आणि लाल प्राणशक्ती असतात. हे चक्र ईश्वरीय ऊर्जेचे प्रवेशस्थान आहे. हे चक्र पिनियल ग्रंथी आणि मेंदूचे नियंत्रण आणि उर्जन करते. प्रत्येक मुख्य चक्राची एक किंवा अनेक उपचपे असतात. या उपचक्रांना लघुचपे असे म्हणतात. उपचक्रांना आणखी कनि÷ उपचपे असतात. या उप-उपचक्रांना सूक्ष्मचपे म्हणतात. उदाहरणार्थ ः प्रमुख बेसिक चक्राला हातात व पायात अनेक उपचपे असतात. तीच हातापायांतील लघुचपे होत. बेसिक चक्राचे उपचक्र हातातील लघुचपे आहेत आणि हातालाही आणखी कनि÷ सूक्ष्मचपे असतात. ती सूक्ष्मचपे बोटांच्या आणि पेरांच्या टोकावर असतात. बोटांच्या टोकावरील असणाऱया या चक्रांना बोटांची सूक्ष्मचपे म्हणतात. चक्रांना ऊर्जेचे भोवरे म्हणून संबोधतात. अशा लहान मोठय़ा चक्रांनी माणसाचे ऊर्जाशरीर भरून टाकले आहे. ऊर्जेच्या याच भोवऱयांना ‘ऍक्मयूपंक्चर पॉईंट्स’ म्हणतात. प्रत्येक चक्राच्या ऊर्जेत होणारा बदल हा माणसाच्या आरोग्याबरोबरच स्वभावावरसुद्धा परिणाम करत असतो. म्हणजे एखाद्या माणसाच्या सोलर प्लेक्सस चक्राची ऊर्जा मुळातच खूप जास्त असेल याचा अर्थ तो माणूस स्वभावाने रागीट आहे. मग त्याचा तो स्वभावगुण कमी होण्यासाठी उपचारक त्याच्या सोलर प्लेक्सस चक्रावर काम करतो, तिथली ऊर्जा नियंत्रित ठेवतो परिणामतः त्या व्यक्तीचा स्वभाव प्राणिक हीलिंगच्या काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर सौम्य होतो. प्राणिक हीलिंग या पूरक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या चक्रांची स्थिती तपासूनच उपचार केले जातात. या चक्रांची ऊर्जा नियंत्रित करून शरीरातील आजार कसा दूर करायचा याचे शिक्षण प्राणिक हिलींगच्या कोर्समध्ये दिले जाते.
आज्ञा अभिषेक कोयंडे








