नवी दिल्लीः भारताच्या मानवाधिकार आयोगाचे नवे प्रमुख सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. निवृत्त होण्यापूर्वी न्यायाधीश मिश्रा यांनी 7 तत्कालीन सरन्यायाधीशांसोबत काम केले होते. 2014 मध्ये मिश्रा यांना न्यायाधीश आदर्श के. गोयल आणि प्रमुख वकील रोहिंग्टन एफ. नरीमन यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती. मिश्रा यांनी माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा, एच.एल. दत्तू, टी.एस. ठाकूर, जे.एस. खेहर, दीपक मिश्र, रंजन गोगोई यांच्यासोबत काम केले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये निवृत्तीवेळी न्यायाधीश मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयात तिसऱया क्रमांकावर होते.
28 ऑक्टोबर 1993 रोजी मानव अधिकार अध्यादेशाच्या अंतर्गत मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे. या संस्थेला घटनात्मक आधार देण्यात आला आहे. हा आयोग मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी उत्तरदायी आहे.









