तरूण भारत, विधी सेवा प्राधिकरण चर्चासत्र, वृत्तांकनाला कायद्याचे अधिष्टान आवश्यक
प्रतिनिधी / रत्नागिरी
एखादी माहिती मिळाल्यानंतर ती आहे तशी न प्रसिध्द करता सत्य समजून घेवून सामाजिक स्वास्थ, वैयक्तिक आयुष्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेत प्रसिध्दी द्यावी. जागरूकता आणि संवेदनशीलता जपत माध्यमांनी वस्तूनिष्ठ लिखाण करावे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा पाधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश आनंद सामंत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी तरूण भारत आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागरूकता आणि संवेदनशीलता, संवाद माध्यमांची या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. विनया घाग, तरूण भारत कोकण समन्वयक, सिंधुदूर्ग आवृत्ती पमुख, शेखर सामंत, तरूण भारत रत्नागिरी आवृत्ती पमुख सुकांत चकदेव आणि तरूण भारतचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
बातमीची सत्यता पडताळणे, बातमीच्या संभाव्य परिणामांचा विचार करणे, निर्भिडपणे बाजू मांडणे या बाबी सांभाळतानाच कायदेशीर चौकटी व मानवतावाद पाळण्याची कसरत वृत्तपत्रांना करावी लागते. पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जपताना अन्यायाला वाचा फोडली जाईल, विश्लेषणात्मक लेखन करताना सदसदविवेकबुध्दी जागी ठेवण्याची गरज न्यायाधीश आनंद सामंत यांनी विशद केली.
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 228 क, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 327, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 24, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 74, मानसिक आरोग्य सेवा कायदा कलम 23 व 24 आदी कलमाविषयीदेखील न्यायाधीश सामंत यांनी सविस्तर चर्चा केली.
लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत 95 टक्के घटना मुलींवरील अत्याचाराच्या आहेत. बालकांवरील अत्याचारानंतर त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांना सामोरे जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करूनच माध्यमांनी वार्ताकन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड.विनया घाग यांनी केले.
बालकांचे मन खूप संवेदनशील असते अशावेळी माध्यमांनी खूप विचारपूर्वक वृत्तांकन करावे असे सांगतानाच दिवसेंदिवस लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून या घटनांना आळा घालण्यासाठी माध्यमांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करावे असे आवाहनही अॅड. घाग यांनी यावेळक्ष मार्गदर्शन करताना केले.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम करताना वृत्तपत्रांनी आपल्या लेखनातून सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी पूरेपूर प्रयत्न करावा. बाललैगिंक अत्याचार, विनयभंग महिलांविषयी वार्तांकन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सखोल माहिती व्हावी यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याचे तरूण भारत कोकण समन्वय शेखर सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रश्नोत्तरेव्दारे तरूण भारत प्रतिनिधींनी मान्यवरांशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाची प्रस्तावना शेखर सामंत यांनी, मान्यवरांची ओळख सुकांत चकदेव यांनी तर निवेदन ज्येष्ठ उपसंपादक विश्वेश जोशी यांनी केले.
मुलांना जगण्याचा अधिकार आहेच परंतु त्यांना विकासाचाही तितकाच अधिकार आहे, त्यासाठी माध्यमांनीही प्रयत्न करावेत. पालकांनी मुलांशी जवळीकता वाढवली पाहिजे, पालक आणि मुलांचे नाते जेवढे दृढ असते तेवढे मुलांना अधिक सुरक्षित वाटते. – अॅड. विनया घग
छोटे छोटे काम करत राहिले तर सामाजिक बदल ग्घडून येतील. यासाठी कायद्यातील तरदूदी समजून घक्षे आवश्यक आहे. यासाठी वाचन, मनन आवश्यक आहे. पीडित व्यक्तीसह संशयितांची प्रतिष्ठा जपल्या जाव्यात यासाठी शासनाचे काही निर्देष व कायद्यांची माहिती करून घेणे अत्यावश्यक असल्याचे न्यायाधीश सामंत यांनी सांगितले. – न्या. सामंत









