प्रतिनिधी /बेळगाव
माधुरी जाधव फौंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले. या आश्रमामध्ये अनेक गरीब व गरजू विद्यार्थिनी इतर राज्यांमधून शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. या विद्यार्थिनींना दिवाळीनिमित्त गणवेशाचे वाटप करण्यात आले.
खडेबाजार बेळगाव येथील ब्रायटल कापड दुकानाचे मालक लतिफ पिरजादे यांचे या कार्यक्रमाला सहकार्य मिळाले. केंद्रातील 40 मुलींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी माधुरी जाधव फौंडेशनच्या संस्थापिका माधुरी जाधव, स्मिता शिंदे, भावेश अष्टेकर, प्रेमा गुरव, सुनीता सुभेदार उपस्थित होत्या. आर्ष विद्या केंद्रातील सोमनाथ चौधरी यांनी आभार मानले.









