मुंबई
कार्डियाक क्लिनिकची साखळी असणाऱया वैद्य साने आयुर्वेदीक लॅबरोटरीजची माधवबाग संस्था लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलता अशा आजारांवर ही संस्था उपचार करते. विविध शहरांमध्ये यांची उपचार केंदे कार्यरत आहेत. संस्थेने सादर केलेल्या ड्राफ्ट पॉस्पेक्टसनुसार संस्थेच्या पब्लिक इशुमध्ये 27,71,200 नवे समभाग प्रत्येकी 73.00 या दराने जारी केले जाणार आहेत. यातून संस्थेला 20.23 कोटी रुपये इतके भांडवल प्राप्त होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहित माधव साने हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. 30 नोव्हेंबर 2021 रोजीपर्यंत माधवबाग कार्डियाक क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स या ब्रँड नावाखाली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात 274 क्लिनिक्स सुरू आहेत. यापैकी 52 क्लिनिक्स ही कंपनीच्या स्वतःच्या मालकिची आहेत. वैद्य साने यांच्या या संस्थेचे अंदाजित मूल्य 49 हजार कोटींचे आहे.









