प्रतिनिधी / सांगली
माधवनगर गांधी चौक येथे समविचारी संघटना व सर्व पक्षीयच्यावतीने निदर्शने करण्यात आली हाथरस उत्तर प्रदेशातील युवतीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी माधव नगर तालुका मिरज येथील गांधी चौक याठिकाणी सर्वपक्षीय सर्व संघटना विविध पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
तसेच पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनाचे जबाबदारी घ्यावी तसेच भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची जबाबदारी घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी माधव नगर येथील सर्व संघटना व पक्षाच्यावतीने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश मालानी, डॉ.ज्ञानेश्वर शिंदे, प्रताप अण्णा विचारे, उत्तम सूर्यवंशी माजी सरपंच शोभाताई चव्हाण, जयश्री ढोणे ग्रामपंचायत सदस्य रेखा बनकरी, उपसरपंच निर्मला जीतू पवार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जितू पवार, सुभाष हत्तीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleअतिवृष्टी आणि कोरोनामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान
Next Article सांगरुळ आठवडी बाजार व एसटी सेवा सुरू करावी








