ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
प्रतिनिधी / माधव नगर
अहिल्यानगर येथे पाणी न सोडण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत मधील पाणी कर्मचाऱ्यास रविवारी सायंकाळी माधव नगर नाका येथे मारहाण दत्तात्रय उर्फ लिंगा हत्तीकर वय 25 असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. अहिल्यानगर नगर येथे गेली दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा असल्याने तेथील रहिवासी राहुल नागेश कांबळे वय 23 व त्यांच्या साथीदारांनी हत्तीकर या पाणी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करून लोखंडी पाण्याने डोक्यात घाव घातले त्यामुळे डोक्यात 22 टाके पडले आहेत.
अशी माहिती ग्रामपंचायत व जखमी कर्मचाऱ्यांचे नातेवाइकांकडून मिळाली असून त्याच्यावर सांगली वसंतदादा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. तत्काळ त्या आरोपीवर कारवाई करावी असे निवेदन माधवनगर येथील राजकुमार घाडगे, महेश साळुंखे, शोभा ताई चव्हाण व ऋतुजा दत्तात्रय हत्तीकर, राधिका गणेश जावीर तसेच ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी सरपंच अनिल पाटील उपसरंपच देवराज बागल यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन केले
Previous Articleचला सातारा शहर बनवूया ‘कलरफुल’
Next Article सांगली : अवैद्य धंदे मोडून काढणार – गेडाम








