ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा करणारे चार फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुबईहून आले. तसेच त्यांनी मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. मात्र, दुबईहून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी दिलेली नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
परब म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दुबईहून चार फोन आले. समोरच्या व्यक्तीने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी बंगला उडवून देण्याची धमकी दिलेली नाही.
निनावी फोनमुळे मातोश्रीवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सायबर पोलीस या फोन कॉल्सबाबत अधिक तपास करत आहेत, असेही परब म्हणाले.









