टोप /वार्ताहर
मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी कासारवाडी वर नेमण्यात आलेल्या प्रशासक नियुक्तिस मुंबई येथील उच्चन्यायालयाने स्थगिती देण्यात आल्याची माहिती सुतगिरणीचे चेअरमन अनिल कवाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
सत्यशोधन समितीचे अध्यक्ष प्रशांत चांदने यांनी संस्थेच्या विरोधात केलेल्या तक्रारी ची दखल घेवुन सहकार कायद्याच्या नियमानुसार सभासद रद्द करण्यात आले आहे. तथाकथित सत्यशोधन समितीला सुतगिरणीच्या एकाही सभासदाचा पांठिबा नाही व सहभाग ही नाही. सभासदाच्या मालकीची असणारी ऐकमेव मागासवर्गीय संस्था आहे.राज्यातिल मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने असणारी संस्था स्वयंघोषित अध्यक्षा मार्फत गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने होणारे सुतगिरणी हे स्मारक बनविण्याचा ध्यास घेतलेले संचालक मंडऴ व सभासद हा विरोधकांचा डाव हानुन पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहि असे पत्रकात म्हटले आहे.
संस्थेच्या कामकाजाबाबतचे अहवाल वेळोवेळी सोलापूर वस्त्रोद्योग चे उपायुक्त यांचेकडे पाठविलेले आहेत.तसेच तपासणी ही केलेली आहे.संस्था गिळंकृत करण्याच्या उद्देशाने गेले काहीदिवस हालचाली करणार्या हातकणंगलेचे स्थानिक आमदार राजु आवळे यांच्या दबावा पोटी व तक्रारीनुसार करण्यात आलेली प्रशासक नियुक्ती उच्चन्यायालयाने खोटी ठरवून त्यास स्थगिती दिलि आहे.असे पत्रकात म्हटले आहे.संस्थेच्या संचालकमंडळाने परीश्रमामुळे व पाठपुराव्यामुळे २५ हजार चात्यांची अद्यावत सुतगिरणी ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्यक्ष सूत उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे. असेही सुतगिरणीचे चेअरमन अनिल कवाळे यांनी पत्रकात म्हंटले आहे.तर संस्थेच्या वतीने मुंबई उच्चन्यायालयात अॅडव्होकेट संदीप कोरेगाव व अॅडव्होकेट एस. डी. सोळांकुरे यांनी काम पाहिले.
Previous Articleसांगली जिल्ह्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, ३२ जणांचा मृत्यू
Next Article सांगली : वायफळेत जमीन खचल्याने मंदिर कोसळले









