प्रतिनिधी / दहिवडी :
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने 17 पैकी 10 जागा मिळवून सत्ता कायम राखली. तर माजी सनदी आधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व अनिल देसाई गट यांच्या माण विकास आघाडीला 7 जागा मिळाल्या.
अटीतटीच्या लढतीत सर्व प्रथम सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ, त्यानंतर ग्रामपंचायत व नंतर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे …
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून विजयी
जगदाळे सूर्याजी विश्वासराव – 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बनगर अर्जुन आगतराव – 306 भाजप व रासप देशमुख विलास आबा – 301 भाजप व रासप सस्ते दत्तात्रय पांडुरंग – 287 भाजप व रासप यादव रमेश दगडू – 285 भाजप व रासप कदम रामचंद्र गणपती – 284 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भोसले कुंडलिक दादासो – 283 राष्ट्रवादी काँगेस आघाडी
सोसायटी मतदार संघ महिला राखीव
जाधव निर्मला नंदकुमार – 314 भाजप व रासप वीरकर वैशाली बाबासो – 302 भाजप व रासप
सोसायटी मतदार संघ इतर मागास प्रवर्ग राऊत अमोल साहेबराव – 308 भाजप व रासप
सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती जमाती झिमल रामचंद्र श्रीरंग – 306 राष्ट्रवादी काँगेस आघाडी
सोसायटी 7 आमदार गोरे पार्टी.. राष्ट्रवादी काँग्रेस 4
ग्रामपंचायत मतदार संघातून विजयी उमेदवार काळे बाळकृष्ण किसन – 420 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी योगेश महादेव भोसले – 366 राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती तुपे रविंद्र पोपट – 371 भाजप व रासप ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल पुकळे ब्रह्मदेव तुकाराम – 385 भाजप व रासप
व्यापारी मतदार संघ विजयी उमेदवार किसन चंद्रोजी सावंत – 195 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शेखर मोतीलाल गांधी -153 भाजप
सोसायटी मतदार संघामधून विजयी उमेदवाराला 283 मतदान मिळाले. व पराभूत उमेदवाराला 281 मते मिळाली. त्यामुळे फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली आहे.