अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 14 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.30
● सात तालुके दहाच्या आतमध्ये
● सातारा, कराडमध्येही बाधित वाढ झाली कमी
● रविवारी दिवसभरात 56 जण नव्याने बाधित
● जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 3.93 वर
प्रतिनिधी / सातारा :
रविवार जिल्ह्यासाठी दिलासा देणारा ठरतो. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यामध्ये नव्याने बाधित वाढ ही केवळ 56 एवढी आहे. तर सगळय़ात कमी माण तालुक्यामध्ये केवळ एक जण नव्याने बाधित आढळून आलेला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुके कोरोना मुक्तीचा निर्धार करत वाटचाल करत आहेत. त्यामध्ये सर्वच तालुके नव्याने बाधित वाढीमध्ये 20 च्या खाली असून सात तालुक्यांमध्ये दहाच्या आतमध्ये बाधित वाढ आलेली आहे. सर्वात जास्त साताऱ्यात तर त्या पाठोपाठ कराड तालुक्यामध्ये बाधितवाढ आहे.
नव्याने जिल्ह्यात 56 जण बाधित
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरावडय़ामध्ये कोरोनाची बाधितवाढ ही घटती राहिली आहे. नव्याने होणाऱ्या बाधित वाढीचे प्रमाण कमी कमी होत असून ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी बाधित संख्या असलेला महाबळेश्वर तालुका तर कोरोनामुक्त कसा हाईल यादृष्टीने सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. त्यापाठोपाठ जावली, वाई या तालुक्यांचा समावेश होतो. आता माण तालुक्यामध्ये रविवारी नव्याने केवळ 1 जण बाधित आढळून आला असून दुष्काळी तालुक्यामध्येही कोरोनामुक्तीचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने खटाव, कोरेगाव या तालुक्यामध्ये बाधितवाढ आटोक्यात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालानुसार जावली तालुक्यात 3, कराड तालुक्यात 11, खटाव तालुक्यात 5, कोरेगाव तालुक्यात 8, माण तालुक्यात 1, पाटण तालुक्यात 2, फलटण तालुक्यात 3, सातारा तालुक्यात 20, वाई तालुक्यात 2 असे सातारा जिल्ह्यातील 55 जण नव्याने बाधित असून इतर जिल्ह्यातील 1 जण असे 56 जण बाधित आढळून आले आहेत. नव्याने आढळून येणारी रुग्णसंख्या ही शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कोरोनामुक्तीचा दर चांगला
नव्याने बाधितवाढ घटू लागल्याचे चांगले चित्र जिल्ह्यात आहे. त्याच बरोबर बाधित असलेले रुग्ण उपचार घेवून बरे होत आहेत. बरे होवून घरी जात आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या चांगली असून हॉस्पिटलपेक्षा घरामध्ये राहून उपचार घेत चांगले ठणठणीत बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर वाढल्याचे दिसत आहे. रिकव्हरी रेट हा 96च्या पुढे सध्या आहे. मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आलेले आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणली जात आहे. आरोग्य यंत्रणा मेहनत घेत आहे.
सोमवारी
नमूने-1426
बाधित-56
सोमवारपर्यंत
नमूने-25,32,598
बाधित-2,78,615
मृत्यू्-6,655
मुक्त-2,70,169









