विहिरीतील दोन सबमर्शिबल पंप चोरले
प्रतिनिधी / बेळगाव
जुन्या पी.बी. रोडवरील माणिकबाग जवळ चोऱयांचे सत्र सुरूच आहे. घरे, दुकाने चोरटय़ांनी आपले लक्ष्य बनविले असून दोन महिन्यात या परिसरात 8 ठिकाणी चोऱया झाल्या आहेत. रविवारी रात्री विहिरीतील दोन सबमर्शिबल पंप चोरण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळातही लेतमशिनचे कारखाने, चष्म्याचे दुकान, ऑटोमोबाईलचे दुकान आदी आठ ठिकाणी चोऱया झाल्या आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर या परिसरात राहणाऱया सतीश श्रीराम मोरे यांच्या विहिरीतील दोन पंप चोरण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
चोरीची घटना उघडकीस येताच मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. मात्र या चोरी प्रकरणाची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या परिसरातील आस्थापनांसमोर रात्री उशीरापर्यंत मद्यपींच्या पाटर्य़ा सुरु असतात. दुकानांसमोर बाटल्या फेकून मध्यरात्री ते निघून जातात.
जाब विचारणाऱयांना धमकावण्याचा प्रकार घडत आहे. दोन महिन्यात एकाच परिसरातील आठ ठिकाणी चोरीच्या घटना घडूनही पोलिसांनी मात्र एकाही प्रकरणाचा छडा लावला नाही. दुकानांसमोर रंगीत पाटर्य़ा करणाऱया टोळक्यांना आवर घालण्याची गरज असून अशा घटनांमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.