वार्ताहर / वरकुटे – मलवडी
ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचालित माणदेश इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सांयन्स अँड रिसर्च सेंटर म्हसवड मध्ये 15 ऑक्टोंबर “वाचन प्रेरणा दिन” आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली.
प्रथम संस्थेचे संस्थापक संचालक डी. डी.कोडलकर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले व त्यानंतर सर्व मान्यवरांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वाचन प्रेरणा दिना निमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचायांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिचे औचित्य साधून विद्यार्थी व शिक्षिकांना वेगवेगळी पुस्तके वाचता यावी व त्यांची वाचनाची आवड जोपासली यावी म्हणून माणदेश इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सांयन्स अँड रिसर्च सेंटर म्हसवड आणि भाटकी येथील कै. सुखदेव पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्यामध्ये करार करण्यात आला.
प्रसंगी कराराचा फायदा विद्यार्थी व शिक्षण यांना त्यांच्या वाक्तिमहत्व विकासात नक्की होईल असे प्राचार्य डॉ.उदुगडे बी. व्हीं.यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. माने व्ही. एस. संस्थापक सचिव प्रा.कोडलकर डी.डी. प्राचार्य डॉ.उदुगडे बी. व्हीं.,उपप्राचार्य बनगर बी. एन., प्रमुख पाहुणे युवा उद्योजक श्री.अजित शिर्के, भाटकी गावच्या पोलीस पाटील सौ. हर्षदा शिर्के, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









