लक्कीकटे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
कार्वे / वार्ताहर
माणगाव ते माणगाववाडी फाटा दरम्यानच्या दोन किमी रस्त्याची चाळण झाली आहे. अत्यंत दुर्दशा झालेल्या या रस्त्यावरून वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे लहानसहान अपघातामध्ये वाढ झाली आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास लक्कीकटे ग्रामस्थानच्यावतीने तीव्र आंदोलन छेडणार आसल्याची माहिती. सामाजिक कार्यकर्ते दयानंद रेडकर यांनी दिली.
हा रस्ता गडहिंग्लज तालुक्याला जोडणारा सगळ्यात जवळचा रस्ता म्हणून ओळखला जातो. गडहिंग्लज, कोल्हापूर या ठिकाणी जाणारे या परिसरातील व हलकर्णी, कार्वे परिसरातील नागरिक प्राधान्याने या रत्याचा वापर करतात. माणगाव पासून काही अंतरावर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात तुर्केवाडी पासूनचे रुग्ण येत असतात. या सगळ्यांना या खराब रस्त्याचा सामना करत यावे लागते. माणगाववाडी, सोनारवाडी मार्गे अडकुर विभागाला सुद्धा जोडणारा हा जवळचा रस्ता आहे.
या परिसरातील दूध व ऊस वाहतूक करणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठा आहे. वाहतूक जास्त असल्याने व रस्त्यावर मोठमोठ्या आकाराचे खड्डे असल्याने, त्या खड्यांमधून पाणी साचल्याने येथे छोटेमोठे अपघात होत आहेत. या खड्ड्यामधून वाहने घातल्याने वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ नुतनीकरण करावे व रस्ता वाहतुकीस योग्य करावा अन्यथा लक्कीकटे ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









